मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टचा प्राडा हा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला. मात्र या म्युझिक व्हिडीओला वादाची किनार लागली असल्याचे समोर येत आहे. कारण पाकिस्तानी अभिनेत्रीने आलियाच्या या म्युझिक व्हिडीओवर आक्षेप घेत आलियाने हे गाणे चोरल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातने हा आरोप केला आहे.
I find this strange. On the one hand Bollywood vilifies Pakistan at every opportunity they get. On the other, they continue to steal our songs without so much as an acknowledgment. “Copyright violation” and “royalty payments” obviously mean nothing.https://t.co/2x48WIGjf3
— Mehwish Hayat TI (@MehwishHayat) August 24, 2019
मेहविशच्या वाइटल साइन या अल्बममधील गोरे रंग का जमाना हे गाणे आणि आलियाच्या प्राडा या गाण्यात साम्य असल्याचे तिने ट्विटरवर म्हटले आहे. एकीकडे बॉलिवूड कलाकार पाकिस्तानला संधी मिळेल तेव्हा ऐकवत असतात. तर दुसरीकडे ते आमचेच गाणे चोरत आहेत. हे खूप विचित्र आहे, असे मेहविशने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मेहविशच्या या आरोपांवर आलियाचे काय म्हणणे आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.