नवी दिल्ली: आरबीआय कडून किसान क्रेडिट कार्डाद्वारे मत्स्यपालन आणि पशुपालन व्यवसाय करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जावर २ टक्केव्याजदर कपात करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात अली आहे. या बरोबरच अल्पकाळासाठी २ लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात ७ टक्के सबसिडी मिळणार आहे. आरबीआय ने ही महत्वाची घोषणा करत शेतकऱ्यांना अनोखी भेट दिली आहे.
दरम्यान या संधीचा फायदा मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना घेता येणार आहे. कारण सरकारने फक्त या या दोनच व्यवसायांकरिता किसान क्रेडिट कार्डाची सुविधा उपकबद्ध करून दिलेली आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. तसेच वेळेवर कर्ज चुकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजावर 3 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. त्यामुळे हे नियम लागूझाल्यास कर्ज घेतलेल्या संबंधित शेतकऱ्यांना फक्त ३ टक्केच व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे.