बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या दुबईमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टी इन्जॉय करत आहे. मात्र, यावेळी ती आपले आईचे कर्तव्ये पार पाडायला विसरली नाही. ती तिची मुलगी निशाला अभ्यास करण्यास मदत करत आहे. सनीचा निशा सोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सनीने स्वत: आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती निशाच्या अभ्यासामध्ये मदत करताना दिसत आहे. सनी निशाला शिकवण्यामध्ये मग्न असल्याचे या फोटोतून दिसून येत आहे. सनीने फोटो शेअर करत असे म्हटले आहे की, “मी सध्या सुट्टीवर आहे. पण मी माझ्या मुलीशी सुसंगततेवर विश्वास ठेवते. मी निशाला गृहपाठ पूर्ण करण्यास मदत केली. आमच्या मागे बुर्ज खलीफाची मोहक दृश्य दिसत आहेत.’
दरम्यान, सनी लिओनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर यांनी 2017 मध्ये निशाला दत्तक घेतले. निशा व्यतिरिक्त सनीला दोन मुलं अशर आणि नोहा आहेत.