नगर – महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच बचत गटातील सर्व महिला आणि सी एम आर सीचे कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन जमा करुन कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना मदत म्हणून 1 लाख 5 हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे सुपूर्त केला.
यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे, सुनील पैठणे, लेखाधिकारी गजानन ढोणे, कार्यक्रम सल्लागार दीपक लुटे, नवनाथ मोरे यांच्यासह सहयोगिनी आणि बचत गटातील महिलांची उपस्थिती होती.