नगर – अहमदनगर महाविद्यालयात विद्यार्थ्यास मारहाण करुन दशहत पसरविणारे आकाश कोरे व अबरार शेख (दोन्ही रा. कोठी) यांच्याविरोधात अखेर कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांची रॅगींग करुन गुंड प्रवृत्तीचा युवक दहशत पसरवित असल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक इशू सिंधू यांची सकाळी भेट घेऊन निवेदन दिले होते. अलीरजा शौकती (वय 18 रा. रामचंद्र खुंट) हा विद्यार्थी महाविद्यालयात आरोपी आकाश कोरे, अबरार शेख व त्याचे साथीदार येत असतात. त्यांची महाविद्यालयात मोठी दहशत असून, दि.16 जुलै रोजी लायब्ररी जवळ अलीरजा हा विद्यार्थी त्याच्या मित्रांसह गप्पा मारत असताना टिकटॉकचे व्हिडिओ पाहून हसला सदर आरोपी व त्याचे साथीदार तेथून जात होते.
आंम्हाला पाहून हसल्याचा राग येऊन त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. अबरार शेख याने आकाश कोरे याच्या हातात कोयता मारण्यासाठी दिला असता दामिनी पथकाची गाडी आल्याने सदर आरोपींनी पळ काढल्याचे फिर्यादित म्हंटले आहे.