‘शिवस्वराज्य’ यात्रेस शिवनेरीवरून प्रारंभ

जुन्नर – मुख्यमंत्र्यांच्या “महाजनादेश यात्रे’ला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि. 6) या “शिवस्वराज्य’ यात्रेचा शुभारंभ किल्ले शिवनेरी येथून झाला आहे. राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचा चेहरा म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे या यात्रेची धुरा सोपवण्यात आली आहे.

यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली. आज सकाळी साडेसात वाजता किल्ले शिवनेरीवर राजमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे पूजन करून यात्रेचा शुभारंभ झाला आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता मार्केट यार्डच्या आवारात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीतील दिग्गज फळी फोडून खिळखिळी केल्याने राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.