पुणे – शहरात सोमवारी पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान, गुरुवारपासून पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मागील 24 तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पुणे शहरात मागील 24 तासांत 3 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गुरुवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. महाबळेश्वर येथे 9 मिमी, राधानगरी येथे 6 मिमी, लोणावळा येथे 4 मिमी, पौड येथे 4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.