लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार थंडावण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींकडून देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. देशभरातील अन्य राज्यांपेक्षा पश्चिम बंगालमध्ये यावेळी निवडणुकांचे वातावरण भलतेच तापले असून भाजपचे सर्वच प्रमुख नेतेमंडळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत असून ममता बॅनर्जी देखील त्यांना चोख प्रतिउत्तर देताना दिसत आहेत.
दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर आज आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्धी माध्यमांच्या सतत झोतात असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगाल येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बंगाल येथील बरसत येथे एका जाहीर सभेला संबोधित करत असताना योगींनी, “देशभरामध्ये यावर्षी मोहरम आणि दुर्गापूजा एका दिवशी आली होती. मला उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांनी विचारलं की आपण दुर्गापूजेची वेळ पुढे ढकलायची का? त्यावर मी त्यांना सांगितलं की दुर्गापूजा वेळेनुसार होईल तुम्ही वाटल्यास मोहरमची वेळ पुढे ढकला.” असं वक्तव्य केलं आहे.
UP CM Yogi Adityanath in Barasat, West Bengal: In whole country, Durga puja & Muharram fell on same day, in UP officers asked me, should we change timing of puja? I said, timing of the puja won't be changed, if you want to change timing, change the timing of Muharram procession. pic.twitter.com/diXyfvZ3n9
— ANI (@ANI) May 15, 2019