पुणे – शिवाजीनगर परिसरातील सिमला ऑफिस चौकाजवळ गर्डर लॉंचिंगचे काम करायचे असल्याने वाहतूककोंडी टाळण्यासाठी व वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरामधील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल ४ मे २०२४ पासून पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू असणार आहेत.
वाहतूकीतील बदल पुढीलप्रमाणे –
– विर चाफेकर चौक ते न.ता.वाडी के.बी. जोशीमार्ग चौक ते सिमला ऑफिसचौक (एस.टी. स्टैंड मार्ग) हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात येणार आहे.
– विर चाफेकर उड्डानपुलावरुन सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहणार आहे.
– फर्ग्युसन कॉलेज रोडवरुन विर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकामध्ये जाण्यासाठी प्रवेश बंद असणार आहे.
– न.ता.वाडी चौक ते चाफेकर चौक प्रवेश बंद राहणार आहे.
– स. गो. बर्ने चौकाकडुन सिमला ऑफिस चौकामधुन शिवाजीनगर रेल्वेस्टेशनकडे प्रवेश बंद राहणार आहे.
– शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून एस.टी. स्टैंड सर्कल वरून न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहणार आहे.
– सिमला चौकाकडुन पुणे विद्यापीठाकडे जाणा-या वाहनांनी एल. आय. सी. कडील बाजुने जावुन चाफेकर उड्डाण पुलाचा वापर करावा.
– विर वाफेकर चौक ते न.ता.वाडी चौक ते सिमला ऑफिस रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्कीग करण्यात येणार आहे.