Live Cricket Score, GT vs DC Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज भारताचे दोन युवा खेळाडू आमनेसामने येणार आहेत. शुभमन गिलचा संघ गुजरात टायटन्सचा सामना ऋषभ पंतच्या संघ दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचा टाॅस संध्याकाळी 7 वाजता होईल, तर सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss update) दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजी करेल.
गुजरातविरुद्धच्या या सामन्यात डेव्हिड वॉर्नर खेळताना दिसणार नसल्याचे पंतने सांगितले. त्यांच्या जागी सुमित कुमारला संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी ऋद्धिमान साहा आणि डेव्हिड मिलर गुजरातच्या प्लेइंग 11 मध्ये परतले आहेत. याशिवाय संदीप वारियरला पदार्पणाची संधी मिळाली आहे. उमेश यादवच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
🚨 Toss Update 🚨
Delhi Capitals win the toss and elect to bowl against Gujarat Titans.
Follow the Match ▶️ https://t.co/SxAzZl3Jf6#TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/banchOKafT
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2024
GT vs DC : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.
इम्पॅक्ट सब : अभिषेक पोरेल, लिझाद विल्यम्स, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, ललित यादव.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर.
इम्पॅक्ट सब : शरथ बीआर, मानव सुथार, शाहरुख खान, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नळकांडे.
या सामन्यात गुजरातचा संघ चार परदेशी खेळाडूंसोबत खेळताना दिसणार आहे. यामध्ये डेव्हिड मिलर, राशिद खान, नूर अहमद आणि स्पेन्सर जॉन्सन यांचा समावेश आहे. तर, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स आणि शाई होप हे दिल्लीसाठी परदेशी खेळाडू म्हणून खेळताना दिसतील.
दरम्यान, गुणतालिकेत गुजरात टायटन्स 6 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे आणि दिल्ली कॅपिटल्स 6 सामन्यांतून दोन विजय आणि 4 गुणांसह 9व्या स्थानावर आहे. अशा परिस्थीतीमध्ये लीगमध्ये पुनरागमन करण्याच्या शर्यतीत असलेल्या दोन्ही संघांमध्ये आजच्या सामन्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते.