वाघापूर, (वार्ताहर) – गुरोळी (ता. पुरंदर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुरेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली. संदीप खेडेकर यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी सरपंच रेणुका खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.
यावेळी सुरेश भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड उपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक नीलिमा धावत्रे यांनी जाहीर केले. यावेळी माजी सरपंच बापूसाहेब शिंगाडे, महादेव शिंगाडे, पांडुरंग खेडेकर , दिवे गराडे गाण्याचे शिवसेना अध्यक्ष पंकज खेडेकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच भोसले यांचा सन्मान करण्यात आला.
या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. गावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी विभागाकडून भेटणार्या वैयक्तिक योजनांचा लाभ गावातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे निवडीनंतर त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर खेडेकर, संदीप खेडेकर, जीवन खेडेकर, मोहिनी खेडेकर, उज्ज्वला जाधवज संपत भोसले, सुरेश खेडेकर, बाळासाहेब मचाले, लक्ष्मण खेडेकर, प्रमोद शिंदे, आनंद खेडेकर, दिलीप खेडेकर, संदीप खेडेकर, प्रवीण खेडेकर, जालिंदर खेडेकर, माऊली मेमाणे, सनी खेडेकर, दत्तात्रय खेडेकर ,गणेश बंड, काका जाधव, किसन खेडेकर, विठ्ठल भोसले, सागर खेडेकर, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.