YS Jagan Mohan Reddy | Lok Sabha Election 2024 – वायएसआरसीपी पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या ताफ्यावरील दगडफेकीच्या घटनेनंतर विश्रांती घेऊन आज आपला बस दौरा पुन्हा सुरू केला आहे. एनटीआर जिल्ह्यातील केसरपल्ले येथून त्यांचा निवडणूक प्रचार बस दौरा पुन्हा सुरू झाला.
विजयवाडाच्या सिंह नगर येथील विवेकानंद स्कूल सेंटरजवळ शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी मुख्यमंत्र्यांवर दगडफेक केली, ज्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांनी ही बस यात्रा तात्पुरती थांबवली होती. । Lok Sabha Election 2024
आज ही यात्रा अटकूर, वीरवल्ली क्रॉस, हनुमान जंक्शन आणि इतर गावातून मार्गक्रमण करेल. जगनमोहन रेड्डी यांनी कडप्पा जिल्ह्यातील इदुपुलुपाया ते श्रीकाकुलम जिल्ह्यातील इच्छापुरमपर्यंत २१ दिवसांची ही बस यात्रा सुरू केली आहे.
या राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक होत आहे. आंध्रात लोकसभेच्या एकूण २५ जागा आहेत. दरम्यान, त्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. । YS Jagan Mohan Reddy | Lok Sabha Election 2024