IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : आयपीएल 2024 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. चेपॉकमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येतील. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना सोमवार, 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल, तर नाणेफेक संध्याकाळी 7:00 वाजता होईल. घरच्या मैदानावर केकेआरविरुद्ध चेन्नईचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. मात्र, सध्याचा फॉर्म बघितला तर यावेळी कोलकात्याचे वर्चस्व दिसते.
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. या कालावधीत एमएस धोनीच्या संघाने दोन सामने जिंकले आहेत तर दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. केकेआरने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. आज श्रेयस अय्यरचा संघ विजय मिळवण्याच्या इराद्याने चेपॉकमध्ये दाखल होईल. केकेआरची सर्व संघांमध्ये सर्वोत्तम धावगती आहे.
आकडेवारीत कोणाचे वर्चस्व…?
चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि कोलकाता संघ आतापर्यंत 29 वेळा भिडले आहेत. या कालावधीत चेन्नई सुपर किंग्जने 18 वेळा विजय मिळवला आहे. तर केकेआरने केवळ 10 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर चेपॉकमध्ये दोन्ही संघ 10 वेळा भिडले आहेत. या कालावधीत चेन्नईने सात वेळा विजय मिळवला आहे.
पिच रिपोर्ट (खेळपट्टीचा अहवाल)
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. आजही येथील खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, सुरुवातीला नवीन चेंडूनेही येथे धावा केल्या जातात. अशा परिस्थितीत आज आपल्याला उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो.
Team India : मोहम्मद शमी कधी करणार पुनरागमन? आयपीएल दरम्यान त्याच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट…
CSK vs KKR : दोन्ही संघाचं संभाव्य प्लेइंग 11 खालीलप्रमाणे –
चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तिक्षना.
कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नारायण, फिल सॉल्ट, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर(कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.