Fadanvis On Eknath Khadase join Bjp : सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत असलेले आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वतः खडसेंनी याबाबतची माहिती दिली आहे. आगामी पंधरा दिवसांमध्ये दिल्लीत आपला पक्ष प्रवेश होईल असं खडसे म्हणाले आहेत. अशात आता खडसेंच्या वापसीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चार वर्षांपूर्वी खडसे यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.फडणवीस आणि खडसे यांच्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. अशात आता खडसे पुन्हा भाजपात येणार आहेत त्यामुळे याबाबत फडणवीसांनी भाष्य केलं आहे. | Fadanvis On Eknath Khadase join Bjp
खडसे यांच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तर त्याला विरोध नाही. मात्र पक्षाने अजून आम्हाला कळविले नाही. पक्षाने कळवले कि आम्ही त्यांचे स्वागतच करु. | Fadanvis On Eknath Khadase join Bjp
पक्ष प्रवेशाबाबत खडसे नेमकं काय म्हणाले ?
“माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. जे पी नड्डा यांची देखील भेट दिल्लीमध्ये घेतली असल्याची माहिती खडसेंनी दिली. शरद पवार यांच्याबाबत बोलताना खडसे म्हणाले,”मी शरद पवार यांचा ऋणी राहील त्यांनी मला संकटकाळात मदत केली.”