Gold-Silver Rate Today| आज शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याने नवा उच्चांक स्थापित करत ७० हजार रुपयांच्या पातळीजवळ पोहोचले आहे. मागील ट्रेडमध्ये १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६९,८९० इतकी होती. तर चांदी ७९,६२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
अलीकडच्या काळात सोन्याच्या भावात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढे जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याच्या किंमती Gold-Silver Rate Today|
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६३,९५६ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ६९,६८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६३,९५६ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,६८० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर ६३,९५६ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,६८० रुपये इतका आहे.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६३,९५६ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,६८० रुपये आहे.
हेही वाचा: