Baramati Loksabha election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024) पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी देण्यात आली. शरद पवार यांच्या गटाची उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटाने देखील सुनेत्रा पवार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करत उमेदवारी जाहीर केली.
गेल्या काही दिवसांपासून बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी काम सुरु केल्याचे पाहायला मिळत होते.त्यामुळे बारामतीमध्ये खरच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज राष्ट्रवादीच्या दोन्हही गटांनी बारामतीमधील आपले उमेदवार जाहीर केले. | Baramati Loksabha election 2024
सुप्रिया सुळे यांच्या उमेद्वारीनंतर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देखील निश्चित झाल्याने बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. | Baramati Loksabha election 2024
राष्ट्रवादी शरद पवार गटाने जाहीर केल्या 5 जागा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024) पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे (Amar Kale), दिंडोरी मधून भास्करराव भगरे (Bhaskar Rao Bhagre) तर नीलेश लंके ( Nilesh Lanke) यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. | Baramati Loksabha election 2024