Live Cricket Score, RR vs DC Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 चा नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
पंतचा संघ या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल तर राजस्थानला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्जविरुद्ध पराभव झाला आहे.
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. (Delhi Capitals Won the Toss & elected to Field) दुखापतीमुळे गेल्या सामन्यातून बाहेर असलेला इशांत शर्मा या सामन्यात दिसणार नाही. त्याचवेळी शाई होपला पाठीच्या समस्येनेही ग्रासले आहे. या दोघांच्या जागी मुकेश कुमार आणि एनरिक नोर्टजे दिल्लीकडून खेळताना दिसणार आहेत. तर, राजस्थान रॉयल्स कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे.
Match 9.Delhi Capitals Won the Toss & elected to Field https://t.co/gSsTvJeK8v #TATAIPL #IPL2024 #RRvDC
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2024
RR vs DC : दोन्ही संघाची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.
इम्पॅक्ट सब : अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशगरा, रसिक दार.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान.
इम्पॅक्ट सब्स : रोवमन पॉवेल, नांद्रे बर्जर, तनुष कोटियन, शुभम दुबे, कुलदीप सेन.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळले गेले आहेत. यापैकी राजस्थानने 14 सामने जिंकले असून दिल्लीने 13 सामने जिंकले आहेत. यावरून सॅमसनच्या संघाचे वर्चस्व दिसून येते. राजस्थानविरुद्ध दिल्लीची सर्वोच्च धावसंख्या 207 धावा आहे तर सॅमसनच्या संघाची सर्वोच्च धावसंख्या 222 धावा केल्या आहेत. आतापर्यंत राजस्थान रॉयल्सने एकदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे.