Miami Open 2024 : – भारताचा टेनिसस्टार रोहन बोपण्णा याने येथे सुरु असलेल्या मायामी ओपन टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा सहकारी खेळाडू मॅथ्यु एब्डेन याच्यासह यशाचा आणखी एक पल्ला गाठला. या जोडीने या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या जोडीने उपउपांत्य फेरीत नेदरलॅंड्सचा सेम वीरबीक व ऑस्ट्रेलियाचा जॉन स्मिथ या जोडीवर ३-६, ७-६, १०-७ असा विजय मिळवला. या सामन्यात पहिला सेट बोपण्णागएब्डेन जोडीने गमावला होता. मात्र, दुसरा सेट जिंकत त्यांनी सामन्यात थाटात पुनरागमन केले. यानंतरही त्यांनीच वर्चस्व गाजवताना तिसरा सेट व सामना जिंकत उपांत्य फेरी गाठली.
बोपण्णाने यंदाच्या वर्षात कमालीची सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने एब्डेनसह यंदाच्या ऑस्ट्रेलियन एओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपदही पटकावले आहे. आता उपांत्य फेरीत बोपण्णा-एब्डेन जोडीचा सामना स्पेनचा मार्सेल ग्लॅनोरस व अर्जेन्टिनाचा होरीको जेबालोस आणि इंग्लंडचा लॉइड ग्लॅसपुल व नेदरलॅंड्सचा जेन रॉजर यांच्यातील विजेत्या जोडीशी होणार आहे.