IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : आयपीएल 2024 मधील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. दोन्ही संघ आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांकडे नवीन आणि तरुण कर्णधार आहेत. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड तर गुजरातचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. या मैदानाचा खेळपट्टी अहवाल (MA Chidambaram stadium Pitch Report) काय सांगतो ते जाणून घेऊया….
CSKvsGT : पिच रिपोर्ट…
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त मानली जाते. वास्तविक, ही एक संथ खेळपट्टी ( Slow pitch) आहे, ज्यावर फटके मारणे सोपे नाही. चेंडू संथ राहत असल्याने फलंदाजांना सावधपणे फलंदाजी करावी लागते. मागील आयपीएल सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे 173 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात 176 धावा करत संघाने विजय मिळवला होता. अशा स्थितीत हा सामनाही उच्च स्कोअरिंग ठरण्याची अपेक्षा आहे.
CSK vs GT : मॅच डिटेल्स…
सामना : सीएसके vs जीटी (CSK vs GT)
कर्णधार : CSK – रुतुराज गायकवाड, GT – शुभमन गिल
सामन्याची वेळ : सांयकाळी 7:30 वा.
ठिकाण : एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
चॅनल प्रसारण : स्टार स्पोर्ट्स चॅनल नेटवर्क
मॅच लाईव्ह (App) : जिओ सिनेमा
चेन्नईचा हवामान अहवाल…
वेदरकॉमने (Weathercom) दिलेल्या हवामान अंदाजानुसार, मंगळवारी चेन्नईमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान 27 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण सामन्यात पावसाची शक्यता नाही.
IPL 2024 : प्रतीक्षा संपली…! अखेर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकीमुळे…
दोन्ही संघाची विजयी सलामी…
दरम्यान, आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात पहिला सामना खेळला गेला.आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेटने पराभव केला. यासह चेन्नईने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली विजयाने सुरुवात केली. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 17 व्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. रविवारी झालेल्या पाचव्या सामन्यात गुजरातने मुंबईवर 6 धावांनी विजय मिळवला.