IPL Live Cricket Score, GT vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा पाचवा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या. एमआयला विजयासाठी 169 धावा कराव्या लागतील. या सामन्यात जसप्रीत बुमराह सर्वोत्तम ठरला. त्याने चार षटकात 14 धावा दिल्या आणि तीन बळी घेतले.
Innings Break ‼️
A calming 4️⃣5️⃣ from Sai Sudarshan & a late little cameo from Rahul Tewatia power #GT to 168/6 🙌
Which team will bag 2️⃣ points after tonight? 🤔
Scorecard ▶️https://t.co/oPSjdbb1YT #TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/tYSJPY6Hcx
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना 24 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरातला प्रथम खेळताना 20 षटकात केवळ 168 धावा करता आल्या आहेत. वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी गुजरातला चांगली सुरुवात करून दिली होती आणि मधल्या फळीच्या आक्रमक वृत्तीनंतरही गुजरात टायटन्सला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
कर्णधार शुभमन गिलने 22 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 3 चौकार आणि 1 षटकारही लगावला. गिल याला पियुष चावला याने रोहित शर्मांकरवी झेलबाद केलं. रिद्धिमान साहाने 15 चेंडूत 19 धावा केल्या, पण जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच षटकात त्याला बोल्ड केले. साई सुदर्शननेही शानदार फलंदाजी करत 38 चेंडूत 45 धावांची खेळी केली. सुदर्शनला बुमराहने तिलक वर्माकरवी झेलबाद केलं.
16व्या षटकापर्यंत गुजरात टायटन्सने 133 धावा केल्या होत्या, मात्र 17व्या षटकात जसप्रीत बुमराहने आपल्या षटकात 2 बळी (डेविड मिलर,साई सुदर्शन) घेत गुजरातच्या फलंदाजीला बॅकफूटवर आणले. पण दरम्यान, राहुल तेवतियाच्या झंझावाती ( 15 चेंडूत 22 ) खेळीने गुजरातच्या आशा वाढल्या होत्या, पण तोही संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकला नाही.
विशेषत: शेवटच्या दोन षटकांत गुजरातचा संघ पूर्णपणे हतबल झाला. एकीकडे बुमराहने 19व्या षटकात केवळ 7 धावा दिल्या आणि 20व्या षटकात जेराल्ड कोएत्झीनेही गुजरातला 170 धावांच्या आत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मुंबई इंडियन्सने केला 7 गोलंदाजांचा वापर…
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील एक मनोरंजक तथ्य म्हणजे मुंबई संघाने 7 गोलंदाजांचा वापर केला. पियुष चावलाने शुभमन गिलची विकेट नक्कीच घेतली, पण त्याने 3 षटकात 31 धावा दिल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त हार्दिक पांड्यानेही अनेक धावा दिल्या. हार्दिकने 3 षटकांत 30 धावा दिल्या, मात्र जसप्रीत बुमराहसमोर गुजरातच्या फलंदाजांना यश मिळाले नाही. बुमराहने 4 षटकात केवळ 14 धावा देत 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. दरम्यान, 18व्या षटकात ल्यूक वुडच्या षटकात राहुल तेवतियाने 19 धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराह आणि जेराल्ड कोएत्झी यांनीही शेवटच्या 2 षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली. जेराल्ड कोएत्झीने 4 षटकात 27 धावा देत 2 गडी बाद केले.