पुणे – सोमवारी (दि.२५) धुलिवंदन आहे. या दिवशी दरवर्षीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, फुल, केळी आणि पान बाजार बंद असतो. त्यानुसार यंदाही बंद राहणार आहे. तसेच, मोशी उपबाजारही बंद आहे. शेतकऱ्यांनी याची दखल घ्यावी.
शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले आहे.