पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होत आहे. आज दिवसभरात कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक 38.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर शहराच्या मध्यवर्ती भागात 36.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मात्र, किमान तापमानात काहीशी घट झाल्यामुळे गेल्या 24 तासांपासून दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारवा असे हवामान पुणेकर अनुभवत आहे.
राज्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागातील कमाल व किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली होती. परिणामी 40 अंशांजवळ गेलेला उन्हाचा पार खाली आला. मात्र, गेल्या 24 तासांत राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होत असून.
विदर्भ वगळता कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस हवामान कोरडे. तसेच कमाल व किमान तापममानात वाढ होण्याची शक्यता असून, किमान तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
शहरातील आजचे कमाल तापमान
कोरेगाव पार्क 38.7, लवळे – 37.9, चिंचवड – 37.4, मगरपट्टा 36.9, पाषाण – 36.6, एनडीए – 36.2, शिवाजीनगर – 36.1, लोहगाव – 36 अंश सेल्सियस