ED On K Kavita| बीआरएसच्या नेत्या के. कविता यांच्या समोरील अडचणी सातत्याने वाढत आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी कविता यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कविता यांना न्यायालयाने 23 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली आहे. यातच आता बीआरएसच्या नेत्या कविता यांच्याबाबत ईडीने मोठा दावा केला आहे.
के. कविता यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत मद्य धोरणात फायदा मिळवण्यासाठी कट रचला होता. त्या बदल्यात त्यांना 100 कोटी रुपये दिले होते, असे म्हटले आहे. तसेच के कविता या कथित मद्यविक्रेत्यांच्या ‘साउथ ग्रुप’ चे प्रतिनिधित्व करत होते असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. कविता यांच्या अटकेनंतर ईडीने या प्रकरणाबाबत एक निवेदन जारी केले आहे. यामुळे आता कविता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
के कविता यांना हैदराबादमधून अटक
के कविता या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या आहेत. त्यांना शुक्रवारी हैदराबाद येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीत न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीने के कविता यांच्या 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने आठ दिवसांची कोठडी मंजूर केली. ईडीने 15 मार्च रोजी सकाळी कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानावर छापा टाकला होता.
या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत 9 समन्स पाठवले आहेत. मात्र, केजरीवाल यांनी या समन्सकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचा: