Ankita Lokhande । ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट भारतीय स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता रणदीप हुड्डा याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात रणदीप सावरकरांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री अंकिता लोखंडे सावरकरांच्या पत्नी यमुनाबाईच्या भूमिकेत दिसणार आहे.
रणदीपचा हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान अंकिता लोखंडेने सांगितले की, ‘रणदीप हुड्डा तिला यमुनाबाईच्या भूमिकेसाठी कास्ट करू इच्छित नव्हता.’
रणदीपसोबतच्या तिच्या भेटीची आठवण करून देताना अंकिता लोखंडे म्हणाली,’रणदीपने मला सांगितले होते की या चित्रपटासाठी मी तुला कास्टमध्ये शोधू असे मला वाटत नाही. तो जे बोलला ते ऐकून मी थक्क झाले. मी त्याला म्हणाले प्लीज असे बोलू नकोस. पण या भूमिकेसाठी तू खूप सुंदर आहेस, असे त्याने मला सांगितले.’
मात्र यादरम्यानची चांगली गोष्ट म्हणजे शेवटी त्याने होकार दिला. या चित्रपटासाठी रणदीपने खूप संशोधन केले आहे. शुटिंगच्या वेळीच त्यांना चित्रपटात काय हवंय हे माहीत होतं, यमुनाबाई सावरकरांबद्दलही त्यांना पूर्ण माहिती होती. त्यांचे (यमुनाबाई सावरकर) पात्र लोकांसमोर कसे मांडावे लागेल हे त्यांना सर्व माहीत होते. त्यामुळे माझे काम सोपे झाले आहे. असेही तिने सांगितले आहे.
हे वाचाल का ?
Seema Haider on CAA । पाकिस्तानमधून पळून आलेल्या सीमा हैदर मिळणार ‘भारतीय नागरिकत्व’