Rohit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकून चौकशी केली होती. याबद्दल रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी पाचारणही करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने मोठी कारवाई केली. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून ‘बारामती ॲग्रो लि.’ कंपनीची मालकी असलेल्या ‘कन्नड सहकारी कारखाना लि.’ या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.
जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल Rohit Pawar ।
ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर रोहित पवार यांनी जोरदार पलटवार केलाय. “माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही दुसऱ्या एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. पण मी महादेवाचा भक्त आहे, अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. त्यावर #लडेंगे_जितेंगे असा हॅशटॅग रोहित पवार यांनी दिला आहे.
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?😂
पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू!
माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न…— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 8, 2024
आता भाजपामध्ये जायला पाहिजे का ? Rohit Pawar ।
“माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?”, अशी प्रतिक्रिया देऊन रोहित पवार यांनी स्माईलीची इमेज टाकली आहे. पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय”, असेही रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार पुढे म्हणाले, “ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.”