माळेगाव, (वार्ताहर)- भिकोबानगर येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन विविध कलागुण दर्शनाने जल्लोषात पार पडले. कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते इयत्ता ९ वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कलागुणांचे सुंदर सादरीकरण केले.
यावेळी प्रमुख पाहुणे निबूंत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश काकडे -देशमुख, खरेदी विक्री संघाचे माजी सभापती दशरथ धुमाळ, संपत जगताप, अमरसिंह जगताप, सत्यजित जगताप, नंदू जगताप, संग्राम जगताप, भगतसिंह जगताप, पोपट कोकरे, समीर धुमाळ,
सुरेश पवार, नरेंद्र जगताप, भीमराव बनसोडे, संदीप जगताप, गौरी जगताप, नानासाहेब जगताप, मोहन कोकरे, रोहित जगताप, विशाल जगताप, अमरजित जगताप, सुरेंद्र भोईटे, अॅड. विजय तावरे उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सतीश काकडे देशमुख यांनी शाळेला १० हजार रुपयांची देणगी दिली. मराठा क्रांती फाउंडेशन बारामती यांनी २ हजार लिटरची पाण्याची टाकी भेट दिली. नीलकंठ निंबाळकर (राजाळे) यांनी ५००० रुपयांची देणगी दिली. उद्योजक विशाल जगताप यांनी ५ हजार रुपये तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजू तावरे यांनी २ हजार रुपये मदत दिली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगताप यांनी भेट दिली. प्राचार्य शिवामती स्वरांजली जगताप यांनी आभार मानले.