Sadhvi Pragya on pm। देशातील लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने आपली पहिली १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत अनेक बडया नेत्यांचा पक्षाने पत्ता कट केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चेला उधाण आलंय. यात चर्चेचं नाव म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर. मध्य प्रदेशमधील भोपाळच्या विद्यमान खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश नाही. त्यांच्याऐवजी भाजपाने भोपाळचे माजी महापौर आलोक शर्मा यांना तिकीट दिलंय. यावरच प्रज्ञासिंह ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली.
मोदीदेखील मला माफ करू शकणार नाहीत Sadhvi Pragya on pm।
एका इंग्रजी वृत्ताविहीनिशी बोलताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पक्षाच्या पहिल्या यादीवर प्रतिक्रिया दिली. याविषयी बोलताना,”मी याआधीही भाजपाकडे तिकिटाची मागणी केली नव्हती. आतादेखील मी पक्षाकडे तिकीट मागणार नाही. मी याआधी केलेल्या विधानात जे शब्द वापरले होते ते कदाचित नरेंद्र मोदी यांना आवडले नसावेत. मोदीदेखील मला माफ करू शकणार नाहीत, असं सांगितलं होतं. मी केलेल्या विधानानंतर माफीदेखील मागितली होती. मात्र त्यामुळेच मला तिकीट नाकारण्यात आलं असावं.” असे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं.
दरम्यान, प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मी भाजपातच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. पक्षाला जेव्हा गरज असेल तेव्हा मी उपस्थित राहीन. पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करेन, असेही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं.
प्रज्ञासिंह ठाकूर काय म्हणाल्या होत्या? Sadhvi Pragya on pm।
प्रज्ञासिंह ठाकूर यांनी २०१९ साली महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उल्लेख खरा देशभक्त म्हणून केला होता. त्यावर मोदींनी नाराजी व्यक्त केली होती. “महात्मा गांधी यांचा अवमान केल्यामुळे मी प्रज्ञासिंह ठाकूर यांना माफ करू शकणार नाही,” असं तेव्हा मोदी म्हणाले होते.
३३ विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलं
भाजपाने आपल्या पहिल्या यादीत एकूण १९५ उमेदवारांची घोषणा केली आहे. यापैकी भाजपाने ३३ नव्या नेत्यांना संधी दिलीय. म्हणजेच भाजपाने एकूण ३३ विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलंय. यामध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. ठाकूर या २०१९ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत.