UPSC Nursing Officer Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नर्सिंग ऑफिसर पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया 07 मार्चपासून सुरू होईल. पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in द्वारे या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. या भरती मोहिमेद्वारे कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कामगार आणि रोजगार मंत्रालयातील 1930 पदे भरली जातील. | UPSC Nursing Officer Recruitment 2024
पात्रता निकष
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात. | UPSC Nursing Officer Recruitment 2024
महत्त्वाच्या तारखा
नोंदणी प्रक्रिया 07 मार्चपासून सुरू होईल आणि 27 मार्च 2024 रोजी संपेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख : मार्च ०७, २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख: मार्च 27, 2024
सुधारणा विंडो : 28 मार्च ते 3 एप्रिल 2024
असा करा अर्ज | UPSC Nursing Officer Recruitment 2024
UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्या.
होम पेजवर उपलब्ध असलेल्या UPSC नर्सिंग ऑफिसर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल.
नोंदणी पूर्ण झाल्यावर, अर्ज भरा.
अर्ज फी भरा.
सबमिट वर क्लिक करा.
भरलेला फॉर्म डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.