कोंढवा – समाविष्ट ११ गावांचा प्रभाग क्र.४२ मधील रखडलेल्या महत्वाच्या विकासकामांसाठी पुणे महापालिकेकडून निधी मिळावा, यासाठी आपण आयुक्तांना सूचना कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माजी नगरसेवक गणेश ढोरे यांनी केली.
माजी नगरसेवक गणेश ढोरे यांनी दिलेल्या निवेदनात, प्रामुख्याने फुरसुंगी, भेकराईनगर व उरुळी देवाची परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्ते विकसित करण्यासाठी व मुख्य व अंतर्गत ड्रेनज लाइन विकसित करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प करण्यात यावा यासाठी तसेच भेकराईनगर वेब गिअर स्कूल जवळील नाल्यावरील कलवड विकसित करण्यासाठी सुमारे दोन कोटी एवढ्या निधीची मागणी केली.
या दोन्ही गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्पामध्ये ज्या नव्याने विकसित झालेल्या परिसराचा समावेश केलेला नाही, अशा भागासाठी नव्याने अंतर्गत वितरण नलिका टाकण्यासाठी निधी मिळावा त्याच बरोबर या भागातील इतर महत्वाच्या कामासाठी ही पुणे मनपाकडून भरघोस निधी मिळावा, अशी मागणी केली. तसेच, मंजूर झालेल्या स्वतंत्र फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पुढील अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन दिले.
आयुक्तांना तत्काळ सूचना…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच दखल घेत तातडीने पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना या दोन्ही गावासाठी २०२४-२५च्या अर्थसंकल्पामध्ये तत्काळ निधीची तरतूद करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे माजी नगरसेवक गणेश ढोरे यांनी सांगितले