Vikhe Patil on Balasaheb Thorat । राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपप्रणित महायुतीत आधीच तीन मोठे पक्ष आले आहेत. शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांच्या बरोबरच आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की अनेक काँग्रेस नेते भाजप मध्ये प्रवेश करणार आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेशाबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. त्यामुळे अनेकांच्या भुवया राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,’भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र नगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात’ विखे पाटील यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला.
हेही वाचा
Eknath shinde । ‘कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल
Sharad Pawar । शरद पवारांची सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया ‘लोकशाहीचा हा मोठा विजय’