राहु : अखिल भारतीय युवक मराठा महासंघ दौंड तालुका अध्यक्षपदी कडेठाण ता. दौंड येथील गणेश दिवेकर यांची तर अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा संयुक्त सरचिटणीसपदी देवकरवाडीचे भाऊसाहेब जगताप यांची नियुक्ती करण्यात आली.
आज अखिल भारतीय मराठा महासंघाची छोटेखानी बैठक विमाननगर पुणे येथे पार पडली. यावेळी युवकांना मार्गदर्शन युवा प्रदेशाध्यक्ष रणजीत जगताप व पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर यांनी केले. राष्ट्रीय चिटणीस दशरथ पिसाळ यावेळेस प्रमुख पाहुणे होते, यांनी देखील मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून जिल्हा अध्यक्ष प्रशांत वांढेकर यांनी पद भूषवले. यावेळी उपस्थित मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक संघटक करणसिंह मोहिते, प्रदेश युवक सचिव केदार वीर,पुणे जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष निनाद टेमगिरे,
पुणे शहर युवक अध्यक्ष मयुरेश पाटील,पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष आकाश कदम, हवेली तालुका शेतकरी आघाडीचे उपाध्यक्ष तुषार साठे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सागर रांजने, पुणे शहर उपाध्यक्ष कौस्तुभ भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.