Mamata Banerjee – तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या खासदारकीचाच राजीनामा दिला आहे. पक्षाच्या अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे त्यांनी राजीनामापत्र पाठवले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या बंगालच्या जादवपूर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. | Mamata Banerjee
मी जादवपूरसाठी एक स्वप्न पाहिले होते. मात्र मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी असलेली कोणीही व्यक्ती राजकारणात आली की ती कामच करत नाही असे म्हणत त्यांना बदनाम करणे अगदी सोपे असते अशी आपली खंत चक्रवर्ती यांनी व्यक्त केली आहे. | Mamata Banerjee
मला राजकारणातील बारकावे समजत नाहीत. जेंव्हा मी लोकांपर्यंत पोहोचली तेंव्हा मला असे जाणवले की बऱ्याच लोकांना माझे येणे आवडले नसावे किंवा बऱ्याच जणांपैकी काही जणांना ते रूचले नसावे. राजकारण माझ्यासाठी नाही. जर तुम्हाला राजकारणात कोणाला मदत करायची असेल तर तुम्हाला तेथे कोणालातरी प्रोत्साहन द्यावे लागते.
एक राजकीय नेता असण्यासोबतच एक अभिनेत्री म्हणूनही मी काम करते. तुम्ही राजकारणात आलात की तुमच्यावर टीका सुरूच होते. मग तुम्ही काम करत असो वा नसो. माझ्या मुद्द्यांवर मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. २०२२ मध्येही मी माझ्या खासदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला होता. मात्र त्यावेळी त्यांनी तो फेटाळला होता. आता त्या जे सांगतील ती प्रक्रिया मी पुढे करेन. | Mamata Banerjee
“नार्वेकरांची भूमिका धृतराष्ट्रासारखी; आजचा निकाल म्हणजे..” जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टचं सांगितलं