अकोले,(प्रतिनिधी) – अकोले नगरपंचायतीच्या वतीने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमास शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, महिला बालकल्याणच्या सभापती तमन्ना शेख, मा.नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांच्यासह सर्व नगरसेवक -नगरसेविका यांच्या संकल्पनेने अकोले नगरपंचायतीच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रम शनिवारी सायंकाळी शहरातील मराठी मुलांची शाळा येथे संपन्न झाला. यावेळी मा.सरपंच हेमलता पिचड,अकोले एज्युकेशनच्या सदस्या कल्पना सुरपुरीया, रंजना जगताप, डाॅ.उमा कुलकर्णी, अश्विनी धुमाळ, वैशाली जाधव, दिलशाद सय्यद व्यासपीठावर उपस्थित होत्या.
महिलांच्या मनोरंजनासाठी आॅर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. महिलांचे काही खेळ घेण्यात आले. नगरसेविका सोनाली नाईकवाडी, शीतल वैद्य-बिबवे, प्रतिभा मनकर, वैष्णवी धुमाळ, कविता शेळके,तमन्ना शेख,माधुरी शेणकर, श्वेताली रुपवते, विमल मंडलिक, जनाबाई मोहिते व बांधकाम विभागाचे अधिकारी कुलकर्णी, कार्यालयीन निरीक्षक प्रियंका गांगुर्डे यांनी सर्व महिलांना हळदी-कुंकू लावून वाण (स्टिलचा डिफिन डब्बा) दिले.
सर्व महिलांसाठी अल्पोपहार ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, नगरसेवक नवनाथ शेटे, प्रदिपराज नाईकवाडी, हितेश कुंभार, विजय पवार, सागर चाैधरी, आरिफ शेखसह नगरसेविका पती नवनाथ मोहिते, मोसिन शेख, परशराम शेळके, रवींद्र शेणकर, बांधकाम विभागप्रमुख उत्तम शेणकर,राहुल मंडलिक, आदेश नाईकवाडी, अमोल मंडलिक, सुमित वाकचाैरे, कर निरीक्षक सुभाष बाचकर,अण्णासाहेब वाकचाैरे, संदीप वाघ, राजेंद्र शेणकर, बाळू मंडलिक, सतीश बाळसराफ, सोमा गायकवाड, सूर्यभान वडजेसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. हळदी-कुंकू कार्यक्रमात नगरपंचायत प्रशासनाला ४०० ते ४५० महिला येतील, असा अंदाज होता मात्र प्रत्यक्षात १ च्यावर महिला सहभागी झाल्या होत्या.
नगरपंचायतच्या वतीने पहिल्यांदाच महिलांसाठीचा हा हळदी-कुंकू उपक्रम घेतला असल्याने आम्हाला व प्रशासनाला अंदाज आला नाही. अपेक्षेपेक्षा जास्त महिला सहभागी होऊन चांगला प्रतिसाद मिळाला. नियोजनात थोडी धावपळ झाली मात्र आलेल्या एकाही महिला-भगिनीला निराश होऊन जाऊ दिले नाही. पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणात व मोठ्या नियोजनात महिलांचा हा हळदी-कुंकू कार्यक्रम घेऊ बाळासाहेब वडजे, नगराध्यक्ष , अकोले नगरपंचायत