Budget 2024 : भारत सरकारने अंतरिम अर्थसंकल्पापूर्वीच एक मोठी घोषणा केली आहे जी मेड इन इंडिया प्रकल्पासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. भारत सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या घटक आणि भागांवरील आयात शुल्क कमी केले आहे. आता मोबाईल पार्ट्सवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.
सिम सॉकेट्स, मेटल पार्ट्स, सेल्युलर मॉड्यूल्स आणि इतर यांत्रिक वस्तूंवरील आयात शुल्क आता 5 टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. मिडल कव्हर, मेन लेन्स, बॅक कव्हर, जीएसएम अँटेना, पीयू केस, सीलिंग गॅस्केट, सिम सॉकेट, स्क्रू आणि इतर प्लास्टिक आणि मेटल सामग्रीवरही आयात शुल्क कमी करण्यात आले आहे.
सरकारच्या या निर्णयावर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाल्या, “आयात शुल्कात सवलत देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सीमाशुल्क प्रक्रियेत अत्यंत आवश्यक निश्चितता आणि स्पष्टता आली आहे. मोबाईल फोन मॅनिफॅक्चरिंग करण्याच्या दिशेने या उचललेल्या या पाऊलाबद्दल मी माननीय पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानते.”
Government of India slashes import duty on key components used in the production of mobile phones. The import duty has been reduced from 15 per cent to 10 per cent. pic.twitter.com/22CIz9Qoch
— ANI (@ANI) January 31, 2024
सरकारच्या या निर्णयामुळे भारतात फोनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या खूप खूश होतील, कारण आता त्यांना कच्च्या मालाच्या आयातीवर कमी कर भरावा लागणार आहे. त्याचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवरही दिसणार आहे.सरकारच्या या निर्णयामुळे मोबाईल स्वस्त होणार आहेत. काही दिवसांपूर्वी ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालात असे म्हटले होते की स्मार्टफोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सवरील आयात शुल्क कमी केले जाऊ शकते. संशोधकांच्या मते, सरकारचे हे पाऊल मेक इन इंडियाला चालना देईल.