नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये उबेर कंपनीने आपल्या सेवा सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली असल्यामुळे अशा प्रकारच्या सेवा सुरू करण्यात येत असल्याचे समजले जाते.
उबेर कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीनगरमध्ये अंतर्गत आणि इतर शहरात जाण्यासाठी आता उबेरची सेवा उपलब्ध होणार आहे. या सेवेचा येथील पर्यटकांना लाभ होणार असल्याचे सांगितले जाते. उबेर ही अमेरिकन कंपनी असून 2013 मध्ये या कंपनीच्या भारतात सेवा सुरू झाल्या.
सध्या भारतातील 125 शहरात या कंपनीच्या सेवा सुरू आहेत. उबरसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीने जम्मू आणि काश्मीरमध्ये सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता इतर कंपन्या जम्मू आणि काश्मीरमध्ये आपले काम वाढविण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.