नवी दिल्ली – टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा सर्वात युवा ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदने मंगळवारी (16 जानेवारी) विश्वविजेत्या डिंग लिरेनचा पराभव केला. या विजयासह प्रज्ञानंदने भारताचा ग्रॅंडमास्विस्टर विश्वनाथन आनंदला मागे टाकले आहे. प्रज्ञानंद आता भारताचा पहिल्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही याच स्पर्धेत डिंगचा पराभव केला होता.
या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला रेटिंगच्या बाबतीत मागे टाकले आहे. प्रज्ञानंद क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहेत. त्याचे २७४८.३ गुण आहेत. तर विश्वनाथन आनंद १२ व्या क्रमांकावर आहे. आनंदचे २७४८.० गुण आहेत. या यादीत मॅग्नस कार्लसन अव्वल स्थानावर आहे.
फॅबियानो कारुआना दुसऱ्या स्थानावर आहे. प्रज्ञानंदच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. २०१६ साली तो सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. वयाच्या अवघ्या १० वर्षे १० महिन्यांत प्रज्ञानंदने ही कामगिरी केली होती. २०१७ साली तो पहिल्यांदा ग्रँड मास्टर झाला.