Bollywood Movie Remakes : रिमेक…रीमेक…रीमेक, हा शब्द गेल्या काही वर्षांत चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. त्याचबरोबर काही बॉलिवूड स्टार्सवर बहुतेक रिमेक चित्रपट बनवल्याचा ठपका बसला आहे. जेव्हाही नवीन चित्रपट येतो, तेव्हा लोकांच्या नजरा तो दुसऱ्या कोणत्या तरी चित्रपटाचा रिमेक आहे का? याकडे नक्कीच असतो.
मात्र, ही चर्चा इथेच थांबवून आम्ही तुम्हाला सांगतो की, चित्रपटाचा रिमेक बनवण्याचा हा ट्रेंड केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही, तर इतर इंडस्ट्री मध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहे. भोजपुरी इंडस्ट्री मध्ये अनेक हिंदी चित्रपटांचे रिमेक बनवले गेले आहेत आणि त्या चित्रपटांमध्ये भोजुरीच्या टॉप स्टार्सनी काम केले आहे. चला तर त्याचित्रपटांवर एक नजर टाकूयात….
1) ‘बागी’
2016 मध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने ‘बागी’ नावाचा चित्रपट आणला होता, ज्यामध्ये त्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसली होती. 2019 मध्ये त्याचा रिमेक भोजपुरीमध्ये बनवण्यात आला होता, ज्यामध्ये अभिनेता खेसारी लाल यादव आणि काजल राघवानी यांची जोडी दिसली होती.
2) ‘बेटा’
1992 मध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा ‘बेटा’ चित्रपट प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. मात्र, याच नावाचा एक चित्रपट भोजपुरीमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात लोकप्रिय भोजपुरी अभिनेता निरहुआ दिसला होता.
3) ‘गदर’
अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर’ हा चित्रपट लोकांच्या मनात घर करून आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला लोकांनी भरभरून प्रेम दिले. भोजपुरीचा पॉवर स्टार म्हटला जाणारा पवन सिंग त्याचा रिमेक मध्ये झळकला होता.
4) ‘राजा बाबू’
राजा बाबू या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि करिश्मा कपूरची जोडी खूपच मजबूत होती. हा 90 च्या दशकातील लोकप्रिय चित्रपट आहे आणि त्याचा भोजपुरीमध्ये रिमेक देखील झाला आहे, ज्यामध्ये निरहुआने मुख्य भूमिका साकारली होती.
5) ‘बॉर्डर’
एवढेच नाही तर सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना यांसारख्या स्टार्सच्या ‘बॉर्डर’चा चित्रपटही भोजपुरीमध्ये रिमेक करण्यात आला आहे, ज्यामध्ये निरहुआची महत्त्वपूर्ण भूमिका होती.