Maldives VS Lakshadweep Controversy: अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. यानंतर त्यांनी लक्षद्वीप ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन देशवासियांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. मात्र, यादरम्यान मालदीवच्या काही नेत्यांच्या कमेंटमुळे मालदीव आणि लक्षद्वीपदरम्यान वाद वाढला. एकीकडे बॉयकॉट मालदीव सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला, तर दुसरीकडे लोक लक्षद्वीपचे फोटो शेअर करत त्याच्या सौंदर्याचे कौतुक करू लागले.
वादामुळे भारतीयांकडून मालदीवचा दौरा रद्द-
मात्र, या सगळ्यात मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार आहे. कारण या वादामुळे भारतीय पर्यटक मालदीवच्या सहली रद्द करत आहेत. अशा परिस्थितीत लोक मालदीवऐवजी लक्षद्वीपला जाण्यास प्राधान्य देत आहेत. टाइम्स अल्जेब्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात अपमानास्पद विधाने केल्यानंतर, भारतीयांनी आतापर्यंत मालदीवसाठीचे 10,500 हॉटेल बुकिंग आणि 5,520 फ्लाइट तिकिटे (मालदीव फ्लाइट तिकिटे) रद्द केली आहेत.
BIG NEWS 🚨 MASSIVE 10,500 Hotel bookings & 5,520 flight tickets to Maldives have been cancelled so far by Indians after Maldivian Ministers made abusive statements against PM Modi, India & Hindus 🔥🔥
Big blow to Maldives President Mohamed Muizzu who ran “India Out” campaign.… pic.twitter.com/Lb3bjM1eyl
— Times Algebra (@TimesAlgebraIND) January 7, 2024
मालदीवच्या पर्यटनावर परिणाम होणार-
सोशल मीडियावरही लोक मालदीवच्या नेत्यांच्या वक्तव्यानंतर प्रवास रद्द करण्याच्या पोस्ट सातत्याने शेअर करत आहेत. त्यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. याचे कारण म्हणजे भारतातून सर्वाधिक पर्यटक मालदीवमध्ये येतात. भारतीय पर्यटकांनी मालदीवमध्ये जाणे बंद केल्यास मालदीवच्या पर्यटनावर त्याचा खोल परिणाम होईल.
2023 मध्ये 2.03 लाखांहून अधिक भारतीयांची मालदीवला भेट-
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये 2.03 लाखांहून अधिक भारतीयांनी मालदीवला भेट दिली. 2022 मध्ये ही संख्या 2.4 लाखांपेक्षा जास्त होती आणि 2021 मध्ये 2.11 लाखांहून अधिक भारतीयांनी मालदीवला भेट दिली. मात्र, मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर आता मालदीव सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे.
पंतप्रधानांच्या भेटीनंतर लक्षद्वीप भारतीयांचे बनले आवडते ठिकाण –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर हे भारतीयांचे आवडते ठिकाण म्हणून उदयास आले आहे. MakeMyTrip ने सोमवारी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यानंतर, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर लक्षद्वीपबद्दलच्या शोधांमध्ये 3,400 टक्क्यांनी वाढ झाली आहे.