IPL 2024 : भारतात यावर्षी आयपीएल होणार नाही? समोर आलं ‘हे’ मोठं कारण…

Indian Premier League 2024 : आयपीएलच्या 17 व्या आवृत्तीला सुरुवात होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. क्रिकेट जगतातील ही सर्वात मोठी लीग मार्चमध्ये सुरू होणार आहे. सध्या, त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर केले गेलेले नाही परंतु असे मानले जाते की आयपीएल 2024 चा उत्साह मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. मात्र यावेळी ही स्पर्धा भारतातच होणार की नाही याबाबत साशंकता आहे.
खरं तर, आयपीएल 2024 सुरू होणार असताना देशात लोकसभा निवडणुकाही सुरू होणार आहेत. कदाचित, जोपर्यंत आयपीएल सुरू आहे, तोपर्यंत लोकसभा निवडणुकाही सुरू राहतील. वेगवेगळ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुका मार्चच्या अखेरीस सुरू होऊन ‘मे’ च्या मध्यापर्यंत चालू शकतात. म्हणजे संपूर्ण आयपीएलदरम्यान देशभरात निवडणुकीची चर्चा रंगणार आहे. आता प्रश्न पडतो की, आयपीएलची तारीख निवडणुकांशी भिडल्याने देशात आयपीएलचे आयोजन होऊ न शकण्याचा काय संबंध?
Keshav Maharaj : ‘मी प्रभू राम आणि हनुमानाचा भक्त’, जाणून घ्या…द. आफ्रिकेचा फिरकीपटू असे का म्हणाला?
या प्रश्नाचे उत्तर यावरून मिळू शकते की, यापूर्वीही देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा आयपीएलचे आयोजन भारताबाहेर करावे लागले होते. 2009 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान भारताबरोबरच UAE मध्येही सामने खेळवले गेले होते. हेच कारण आहे की, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे, आयपीएलचे आयोजन भारताव्यतिरिक्त अन्य देशात केलं जाऊ शकते.
निवडणुकीमुळे आयपीएल आयोजनावर परिणाम का होतो?
लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोनदा आयपीएलचे आयोजन देशाबाहेर का करावं लागले, असा प्रश्नही उपस्थित होतो. यामागे अनेक कारणे आहेत. सर्व प्रथम, ही आयपीएल एक मोठी स्पर्धा आहे. अशा स्थितीत संपूर्ण दोन महिने सामन्यांदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागेल. लोकसभा निवडणुकीमुळे या सुरक्षा व्यवस्थेत थोडीशी कपात होण्याची शक्यता आहे कारण निवडणुकीच्या काळातही देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. मग निवडणुकीच्या काळात वातावरण बिघडण्याची भीती आहे. निवडणुकीच्या वेळी होणार्या मॅचेसमुळे कायदा व सुव्यवस्थेत मोठे बदल करण्याची गरज असते. त्यामुळेच हे सर्व टाळण्यासाठी आयपीएलचे दोनदा भारताबाहेर आयोजन करावे लागले.
#INDvAFG T20I Series | रोहित शर्माला कर्णधार म्हणून ‘एक’ मोठा विक्रम करण्याची संधी…
त्यामुळे यावेळी काय होणार?
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतात आयपीएल झाली. त्यावेळी निवडणुका आणि सामन्यांच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेत चांगला समतोल राखण्यात आलेला दिसून आले होते. मतदानाचा टप्पा लक्षात घेऊन सामन्यांच्या तारखाही ठरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाही निवडणुकांसोबतच भारतात एकाच वेळी आयपीएलचे आयोजन होण्याची शक्यता आहे.





