आरपीआय शाखेचे उद्घाटन झाल्याने कार्यकर्त्यांत नवचैतन्य
भोर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड शाखेच्या नामफलकाचे भोर येथे उद्घाटन करण्यात आल्याने, कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण तयार झाले असून नवचैतन्य निर्माण झाल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे पहिल्यांदाच भोर तालुक्यात पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आले होते.
यावेळी भोर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी शिवतीर्थाजवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या शाखेच्या नाम फलकाचे उद्घाटन केले,
यावेळी, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश केदारी, प्रदेश सरचिटणीस संदिपान साबळे, प्रदेश कार्याध्यक्ष विष्णुदादा भोसले, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मंगेश सोनवणे, जिल्हा अध्यक्ष सूरज गायकवाड, पश्चिम महाराष्ट्राचे सचिव स्टिवन जोसेफ, रिपब्लिकन पारधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पवार, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हा सचिव सुभाष सहजराव,
सामाजिक कार्यकर्ते डॉ. विनायक गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे भोर तालुक्याचे माजी अध्यक्ष अनिल गायकवाड, भोर तालुका श्रमिक ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष संतोष जाधव, रिपाइं नेते बळीराम सोनवणे, युवानेते स्वप्निल पाटोळे, भोर तालुका उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मिनाज कपूर,
भोर शहर अध्यक्ष जितेंद्र सुपेकर, शहर उपाध्यक्ष गोपाळ तायडे, सरचिटणीस मनोज रवळेकर, युवानेते प्रशांत जाधव, युवानेते विशाल सपकाळ, नितीन ओव्हाळ, अक्षय गायकवाड यांसह रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे विविध पदाधिकारी उपस्थित होते,