Mumbai Trans Harbor Link – शिवडी न्हावाशेवा सागरी सेतुचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू हा 12 जानेवारीपासून सेवेत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारीला नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. याच वेळी मुंबई न्हावाशोवा सागरी सेतूचे उद्घाटनची तयारी राज्य सरकारकडून सुरू आहे.
देशातील सर्वात लांब समुद्री पूल अर्थातच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करता येणे शक्य होणार आहे. हा मार्ग 22 किमी लांबीचा असून जवळपास 18 किमी समुद्रातून आहे.
त्याचप्रमाणे इतर पावणे चार किमीचा मार्ग हा जमिनीवरील आहे. मुंबईतल्या शिवडीतून नवी मुंबईचे अंतर आता अवघ्या 20 मिनिटांत कापता येईल. दुसरीकडे हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला देखील जोडला जात आहे. यामुळे मुंबई-पुणे अंतर देखील कमी होण्यास मदत होईल.