Entertainment : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भटने ख्रिसमसच्या दिवशी आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा सर्वांना दाखवला. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यानंतर नेटकऱ्यांनी राहा तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचा अंदाज लावला. काहींनी ऋषी कपूर यांचे बालपणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे राहाचा चेहरा पाहून अभिनेता धर्मेंद्र देखील भावुक झाले आहेत.
ऋषी कपूर यांचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं. ऋषी कपूर यांचं जाणं फक्त त्यांचं कुटुंबच नाही तर चाहत्यांसाठीही मनाला चटका लावणारं होतं. त्यानंतर आता धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Yadon ki yaad 💕jab aa jaati hai !!! https://t.co/DhSIN0jdVl
— Dharmendra Deol (@aapkadharam) December 26, 2023
धर्मेंद्र यांनी पोस्टमध्ये एका चाहत्याने इंस्टाग्रामला शेअर केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ऋषी कपूर, राहा आणि राज कपूर यांच्या फोटोंचा कोलाज करण्यात आला आहे. तसंच एक वॉइस ओव्हर जोडण्यात आला आहे, जो अभिनेत्याने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आठवणींची आठवण जेव्हा येते’. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, आलिया आणि रणबीरने 6 नोव्हेंबर रोजी राहाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. आलिया आणि रणबीरने खास पद्धतीने लेकीचा वाढदिवस साजरा केला होता. आलियाने राहाची छोटीशी झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. या फोटोंमध्ये राहा केक स्मॅश करताना दिसत होती.