पुणे – क्रीडा प्रबोधिनी संघाने जीएसटी कस्टम संघावर ३-० अशी मात केली आणि एमजे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. महिलांच्या गटात मात्र पीसीएमसी अकादमी संघाने क्रीडा प्रबोधिनी संघाला ५-२ असे पराभूत केले आणि अजिंक्य पदावर नाव कोरले.
ही स्पर्धा नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने आयोजित केली होती. पुरुष गटात विजेतेपद मिळविणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी संघाला सात हजार रुपयांचे तर उपविजेत्या जीएसटी संघाला सहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या मध्य रेल्वे संघाला पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
IPL 2024 : आयपीएलच्या भारतातील आयोजनाबाबत संभ्रम, समोर आलं ‘हे’ कारण…
महिला विभागातील विजेत्या पीसीएमसी अकादमीने पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळविले तर उपविजेत्या क्रीडा प्रबोधिनीला चार हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या मुंबई रिपब्लिकन्सला तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. दिवंगत संघटक मोती जॉन यांच्या पत्नी मारिया सबरीना, हॉकी महाराष्ट्र समिती सदस्य जॅसिंटा जाधव, आणि सदस्य डोरोथी एझेकील यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.