सातारा – सांविधानिक पदावरील व्यक्तींचा अपमान करणाऱ्यांना संसदेतून कायमचे बडतर्फ करावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली. या निवेदनाची प्रत पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडे पाठवली आहे. तर सातारा जिल्ह्यातील फलटण येथे मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिली.
लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती मा.जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करीत होते आणि स्वतःला जगातला एकमेव शहाणा म्हणवणारे काँगेस चे राहुल गांधी हे निर्लज्जपणे त्याचे चित्रण करीत होते. ही बाब भारताच्या संविधानाला गुंडाळून ठेवण्यासारखी आहे असेही धैर्यशीलदादा यांनी स्पष्ट केले.
धैर्यशीलदादा पुढे म्हणाले, खासदार पदावर असणाऱ्या एखाद्या लोकप्रतिनिधी ने सांविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबाबत असे वर्तन करणे हे लोकशाहीचा आणि समस्त भारतीयांचा अपमान करण्यासारखे आहे. या बाबत कडक कायदे करून असा सांविधानिक पदावरील व्यक्तीचा अपमान करणाऱ्यास कायमचे बडतर्फ करावे आणि त्यांना शिक्षा व्हावी जेणेकरून पुन्हा असे वर्तन करण्याचे धाडस कुणाकडूनही होणार नाही.
यावेळी लोकसभा समन्वयक सुनील काटकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीण पूर्व अध्यक्ष निलेश नलावडे, सरचिटणीस मनीषा पांडे, जिल्हाउपाध्यक्ष राहुल शिवनामे, बाळासाहेब गोसावी, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. उत्कर्ष रेपाळ, रवींद्र आपटे, जिल्हाध्यक्ष अनु जाती मोर्चा अमित भिसे, प्रदेश चित्रपट आघाडी पोस्ट प्रॉडक्शन प्रमुख विकास बनकर, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, विक्रांत भोसले, प्रविण शहाणे, विनायक थोरात,अमोल टंगसाळे, अमोल कांबळे, प्रशांत जोशी, कृणाल मोरे, अनिता बोडस, अंजली त्रिमके, अजय काटवटे, चैतन्य बोडस, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.