संगमनेर – थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सव २०२४ निमित्त सहकारामहर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रजिस्ट्रार आचार्य बाबुराव गवांदे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व श्रीराम कुऱ्हे यांनी दिली.
त्याचदृष्टीने जानेवारी २०२४ मध्ये अकोले व संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रत्येक गटातील विजेत्या प्रथम स्पर्धकास जयंती महोत्सवात आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत एकूण चार गट असणार असून,
इ ५ वी ते ७ वी या गटासाठी स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य व संगमनेरच्या विकासात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांचे यांचे योगदान, हे विषय असून इ.८ वी ते १० वी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी दंडकारण्य अभियानाचे प्रणेते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे विषय असणार आहेत. इ.११ वी ते १२ वी साठी सहकार पंढरीचे वारकरी – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनातील नवी पहाट सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, कृषीक्रांतीचे दूत डॉ.अण्णासाहेब शिंदे हे विषय राहतील.
वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी संगमनेरच्या ग्रामीण विकासात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांचे यांचे योगदान, सहकारातील राजहंस सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, नवस्वातंत्र्य भारतातील हरितक्रांतीचे उपासक डॉ.अण्णासाहेब शिंदे असे विषय असतील. या स्पर्धेत रोख पारितोषिकांसोबत विजेत्या स्पर्धेकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल.