पुणे : मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील एका लग्नाच्या वरातीत नाचण्याहून भांडण झाल्या प्रकरणात अमित तुकाराम शेळके (रा.शिवणे) याला पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए .एन. मरे यांनी जामीन मंजुर केला आहे.
दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी पौड पोलीस स्टेशन येथे सदर घटनेची एफआयआर नोंदविण्यात आलेली होती . घोटावडे येथील शेळकेवाडी हॉटेल मैफिल समोर आरोपींनी ३ तरुणांना अडवून कोयता व लाकडी काठ्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात एकूण ८ आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे ,मारहाण करणे बेकायदा जमाव बनवणे , बेकायदा शस्त्र बाळगणे संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपीने ॲड. अभिषेक हरगणे, ॲड.ओंकार फडतरे, ॲड. अजिंक्य पोळ, ॲड. चैतन्य अभंग यांच्या मार्फ़त जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाख़ल केला होता. आरोपीचे नाव एफआयआर मध्ये नाही, आरोपी सदर ठिकाणी उपस्थित असल्याचा कोणताही पुरावा नाही तसेच आरोपीने कोणतेही शस्त्र वापरले नाही.
असा युक्तिवाद आरोपीतर्फ़े ॲड. अभिषेक हरगणे आणि वकिलांनी केला .उच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाड्याचे दाखले दिले.बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस पन्नास हजाराच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला.