महाराष्ट्र – न्यू इयर घरात साजर करण्याचा विचार करून डिसेंबरच्या सुरुवातीलाच बीच पार्टीसाठी कोकणात (Konkan beach) जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कोकणातील सागरी पर्यटन (Sea Nature) काही दिवसांसाठी बंद असणार आहे. याला निमित्त ठरलं आहे पंतप्रधान मोदींच आगमन.
हो हे खरं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदर (Malvan best beach) हद्दीतील समुद्री पर्यटन तब्बल आठ दिवस बंद राहणार आहे. यादरम्यान मालवण बंदर हद्दीतील मासेमारी, समुद्री प्रवासी वाहतूक, जलक्रीडा यावर बंदी घालण्यात आली आहे. (Konkan activity)
यामुळे कोकणात पर्यटनासाठी (Konkan tourist) येणाऱ्या पर्यटकांना मालवण, तारकर्लीसहइतर बिचेसचा (Tarkarli beach) आनंद घेता येणार नाही. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत हे सागरी पर्यटन बंद असणार आहे. (Sindhudurg all beaches)
यादरम्यान नौसेना दिनानिमित्त (Neavy day) पंतप्रधान मोदी (PM Modi) सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधानांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) देखील हजेरी लावणार आहेत. म्हणूनच खबरदारी म्हणून या निर्णय घेण्यात आल्याचे समजते. (PM Modi in Sidhudurg)