पुणे – देवगड हापूसच्या (Devgad hapus) आगाप उत्पादनतील आंब्याची पहिली आवक रविवारी (दि.२६) पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात (MarketYard) आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्या १८०/१८१ तुळजाराम पंथाराम बनवारी काची या गाळ्यावर झाली.
पाच पेट्यांपैकी ५ डझनाच्या एका पेटीला तब्बल २१ हजार रूपये भाव मिळाला. तर, त्याखोलाखाल इतर पेट्यांना १५ आणि ११ हजार रूपये याप्रमाणे पेटीला भाव मिळाला. कोथरूड येथील खरेदीदार ज्योतिराम बीराजदार आणि जगन्नाथ वंजारी यांनी या आंब्याची खरेदी केली. (Hapus in pune)
देवगड (Devgad) येथील रज्जाद काची यांच्या बागेतील हा आंबा असून मुंबईहुन पुण्यात रविवारी दाखल झाला. टप्प्पाटप्प्याने देवगड हापूसचा हंगाम सुरू होऊन, फेब्रुवारी मध्ये नियमित हंगाम सुरू होईल अशी माहिती आंब्याचे आडतदार युवराज काची यांनी दिली.