बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एकापाठोपाठ विधानानंतर बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. अशात, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘लाडू खाण्यावरून वाद’ पाहायला मिळाला आहे. आज भाजप आमदारांनी बिहार विधानसभेसमोर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात निदर्शने केली.
विधानसभा पोर्टिको में मिठाई खिलाने को लेकर आपस में भिड़े BJP और RJD के विधायक।आरक्षण बिल पास होने की ख़ुशी में आरजेडी विधायक ने बीजेपी विधायकों मिठाई खिलाना चाहा दोनों दलों के विधायकों के बीच जमकर हुआ तू -तू मैं -मैं
ऐसा नहीं होता है भाई,एक तो ऐसे ही विधानसभा गरम हो रखा है.! pic.twitter.com/D19t93Qks6
— Mukesh singh (@Mukesh_Journo) November 10, 2023
दरम्यान, उपमुख्यमंत्री तेजस्वी यांचा पक्ष आरजेडीने आरक्षण विधेयकाबाबत भाजप आमदारांना लाडू खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरजेडी आमदारांचा हा प्रयत्न भाजप आमदारांना पसंत पडला नाही, आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी भाजप आमदारांनी राजद आमदारांचे लाडू फेकले. आणि काही क्षणात हाणामारी सुरु झाली.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या दोन विधानांचा भाजप सध्या निषेध करत आहे. बिहार विधानसभेत त्यांनी पहिले विधान केले, ज्यात नितीश यांनी लोकसंख्या नियंत्रण आणि महिला शिक्षणावर स्पष्टीकरण देताना अनेक आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या. भाजपने नितीश कुमार यांना यावरून घेरले आहे,