Anushka Sharma : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) सोशल मीडियावर कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर विराटसोबतचा अनुष्काचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यानंतर अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. ज्यात ती बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बेंगळुरूमधील एका हॉटेलमधून व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का पती विराट कोहलीसोबत हातात हात घालून चालताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनुष्का खरचं प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “अनुष्का 100 टक्के प्रेग्नेंट आहे.” दुसर्या नेटकऱ्याने लिहिले, “अनुष्का आधीपासूनच प्रेग्नेंट आहे.”
View this post on Instagram
अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अनुष्काचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर येत होते. हे फोटो आणि व्हिडीओमधून अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे म्हंटले जात होते. परंतुत्यांनी प्रग्नेंसीचे वृत्त खोटं असल्याचे सांगितले होते. अशातआता 9 नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री आई होणार असल्याची दिसत आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, विराट आणि अनुष्काचा विवाह 11 डिसेंबर 2017 झाला होता. लग्नानंतर चार वर्षांनी 2021 मध्ये अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. वामिका असे विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव आहे. त्यानंतर आता अनुष्का आणि विराट पुन्हा एकदा आई- बाबा होणार असल्याची चर्चा रंगली आहे.